सोलापूर : येथील एस. आर. फाऊंडेशन आणि इन्फाक फी सबिलिल्लाह ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने समाचार चौकातील मनपा सेंट्रल उर्दू मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सोलापूर शहर शिवसेना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शाहीन शेख यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. एस. आर. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहिल रामपूरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर शिवसेना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, मौलाना ताहेर बेग मोहम्मदी, ॲड. इमरान शेख, उद्योगपती सोहेल मोतीवाला, शोहेब चौधरी, इम्तियाज शेठ रंगोली आर्ट, सलमान तुळजापूरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बादशाह शेख, इम्तियाज, मौलाना अन्वर मुतवल्ली, फुरकान रामपूरे, साहेब युनुस शेख, अय्युब पठाण, अक्रम शेख, इमरान बागवान, जिशान पटेल, सैफुल्लाह शेख आणि अकिब रामपुरे आदींनी परिश्रम घेतले.
