इंडियन ओव्हरसिज बँकेच्या 51 खातेधारकांविरुध्द सायबर फ्रॉडप्रकरणी गुन्हे दाखल

shivrajya patra

सोलापूर : सायबर फ्रॉडमधील विविध रक्कमा असे एकूण  6, 17, 347 रुपये रक्कम स्विकारुन ते अनेक माध्यमाद्वारे पुढे वळते केल्याचे सायबर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर 58 खातेधारक आणि वापरकर्त्यां सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू होता, असं सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. 

येथील स्टेशन रोड रेल्वे लाईन परिसरातील इंडियन ओव्हरसिज बँक शाखेत मागील एका वर्षापासून अनेक खातेक्रमांक धारक आणि वापरकर्त्यांनी, त्यांच्या बँक खात्यात सायबर फ्रॉडमधील विविध रक्कमा स्विकारुन अनेक माध्यमाव्दारे पुढे वळते केले. 

तसेच बँक खातेधारक व इतरांनी मिळून अनेक नागरीकांची फसवणूक करुन मालमत्ता मिळवली, असल्याचं सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. सायबर फ्रॉडमधील फसवणुकीचा प्रारंभी 6, 17, 347 रुपयांचा आकडा असला तरी सखोल तपासात तो वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इंडियन ओव्हरसिज बँक शाखेतील सायबर फ्रॉडप्रकरणी सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याचे पोकॉ/547 साळुंखे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार 51 खाते क्रमांक, धारक आणि वापरकर्त्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता क 318 (4), 317 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

या खातेधारकांनी सायबर फ्रॉडमध्ये नागरिकांची जाणीवपूर्वक फसवणूक करून ती रक्कम इतरत्र वळती केली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस उपनिरीक्षक भोपळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top