पत्रकार कृती समिती आणि अप्पाश्री मित्र परिवाराकडून डी. डी. पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

shivrajya patra

सोलापूर : जिल्हा परिषद येथील बागेत पत्रकार कृती समितीचे कार्याध्यक्ष डी. डी. पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पांढरे यांच्या कार्याचा गुणगौरव करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. 

हा कार्यक्रम तिसरी आँख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र, प्रदेशाध्यक्ष आणि पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. अप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते डी. डी. पांढरे यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी पांढरे यांचा शाल, टोपी आणि पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती व समाजहिताच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणिअधिकाधिक यशासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास नितीन करजोळे, इनुस अत्तार, मिलिंद प्रक्षाळे, सिद्धाराम नंदरगी, गिरमल्ला गुरव, अक्षय बबलाद, अस्लम नदाफ, दशरथ काळे, हणमंत वाघमोडे, आबा तळभंडारे, सलाऊद्दीन शेख, महेश जाधव, सुरज रजपूत, ऋषिकेश ढेरे, गणेश भालेराव, साजिद मकानदार, चैतन्य घोडके, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे युवा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज मोरे तसेच साप्ताहिक यश क्रांतीचे व डी. डी. दर्पण न्यूज चे कार्यकारी संपादक यश पांढरे, विजू नागमोडे, आरटीआय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top