रायपूर येथील रवी शंकर विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअर असलेले मोहन व्ही. 1990 मध्ये एनटीपीसीमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी म्हणून रुजू झाले. त्यांच्या सुमारे 36 वर्षांच्या गौरवशाली आणि यशस्वी कारकिर्दीत, त्यांनी बाल्को (कोरबा), तालचेर कनिहा, सिपत, सोलापूर आणि खरगोन यांसारख्या एनटीपीसीच्या विविध प्रमुख प्रकल्पांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.
ऑपरेशन्स विभागात आपल्या कार्यकाळात, मोहन व्ही. यांनी प्रकल्पांची कार्यचालन उत्कृष्टता आणि विश्वसनीयता वाढवण्यासाठी आजवर महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. 
एनटीपीसी सोलापूर येथे प्रकल्प प्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, त्यांनी एनटीपीसी खरगोन येथे इंधन व्यवस्थापन आणि संचालन व देखभाल (O&M) विभागाचे महाव्यवस्थापक आणि प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहिलं आहे.
मोहन व्ही. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, महाव्यवस्थापक (संचालन आणि देखभाल) सुभाषीश बंदोपाध्याय, अतिरिक्त महाव्यवस्थापक (व्यवस्थापन) कन्हैया दास यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्प प्रमुख मोहन व्ही. यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केले.
*****
