भक्तांसाठी प्रसाद म्हणून बनविलेल्या 'दाल-चावल' मध्ये जनावराची चरबी ?; नगरसेविका सौ. वाडेकर यांची तक्रार !

shivrajya patra

शाकाहारी 'दाल-चावल' मध्ये चरबी मिसळल्याचा खळबळजनक आरोप

सोलापूर : MIDC हद्दीत कीर्ती नगरात मंदिरामध्ये दोन दिवसापूर्वी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी भक्तांसाठी 'शाकाहारी दाल-चावल' महाप्रसाद म्हणून देण्याची व्यवस्था होती. हा प्रसाद बनवणाऱ्या कंत्राटी आचाऱ्यांनं त्यात जनावरांची चरबी मिसळून धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मनपातील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका सौ. पूजा श्रीकांत वाडेकर यांनी एका निवेदनाद्वारे अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडं करण्यात आल्याचं पुढं आलंय. 

भाविकांच्या धार्मिक भावना दुखावून तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अब्बास अली मुल्ला या आचाऱ्यानं महाप्रसादाच्या जेवणात 'जनावराची चरबी' वापरल्याचा गंभीर आरोप प्रभाग क्र.09 (क) च्या नगरसेविका सौ. पूजा श्रीकांत वाडेकर यांनी सोमवारी, 06 जुलै रोजी सहाय्यक आयुक्तांकडं दिलेल्या तक्रारी अर्जाद्वारे केलाय. 

हा प्रकार अत्यंत गंभीर असून, यामुळे परिसरातील हिंदू भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचं भय नगरसेवका सौ. वाडेकर यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अनेक मागण्या मांडल्या आहेत.

लोकांच्या धार्मिक श्रद्धा आणि आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच चाप लावणे गरजेचे आहे. तरी अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित योग्य ती कारवाई करावी, अशी विनंतीही त्यांनी तक्रारी अर्जात केलीय. या अर्जानं सामान्यातल्या सामान्यांचं पोट भरणारा 'दाल-चावल' संशयाच्या वलयात आला आहे.

.... चौकट .....

... या आहेत मागण्या !

कठोर कारवाई : 

भाविकांच्या भावनांशी आणि आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित आचारी आणि त्यामागे असलेल्या टोळीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तातडीनं कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

शहरातील गाड्यांची तपासणी : 

सोलापूर शहरात अनेक ठिकाणी 'दाल-चावल'चे गाडे/स्टॉल्स लावले जातात. प्रशासनाने अशा सर्व ठिकाणी तातडीने धाडी टाकून तेथील खाद्यपदार्थाच्या दर्जाची आणि घटकांची तपासणी करावी. 

स्पष्ट फलक लावण्याचे असावेत आदेशः जर कोणत्याही दाल-चावल किंवा खाद्यपदार्थात मांसाहारी घटक अथवा जनावरांची चरबी वापरली जात असेल, तर संबंधितांना त्यांच्या गाड्यावर/फलकावर "हे अन्न मांसाहारी (Non-Veg) आहे" असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात यावे. 

ज्यातून ग्राहकांची होणारी दिशाभूल टाळता येणार आहे, असंही त्या तक्रारीत सौ. वाडेकर यांनी म्हटलं आहे, मात्र त्या दाल-चावल मध्ये जनावरांची चरबी वापरल्याचा आरोप करताना त्याची तपासणी झाली किंवा कसं याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचंही त्या तक्रारीत  दिसतंय.

हा तक्रारी अर्ज नगरसेविका सौ. पूजा श्रीकांत वाडेकर यांनी यांचे पती श्रीकांत वाडेकर यांनी अन्न व औषध प्रशासनाकडं दिला असल्याचं छायाचित्र सामाजिक माध्यमावर सामायिक करण्यात आला आहे.

To Top