डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात डॉ. स्मिता पाटील यांचं साहित्य

shivrajya patra

मोहोळ/विष्णू शिंदे : येथील  डॉ. स्मिता पाटील यांच्या संस्कृती प्रकाशन, पुणे प्रकाशीत 'शोध सुखाचा' या पुस्तकातील साहित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालं आहे. बी. ए. तृतिय वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या साहित्याचा समावेश केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन होत आहे.

या आधी त्यांच्या गमंत गाणी बालकविता संग्रहातील 'झोका' ही कविता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळाकडून इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी निवडण्यात आलेली होती. 

त्यांची समीक्षा (कविता संग्रह), गमंत गाणी (बालकविता संग्रह), शोध सुखाचा (ललित लेख संग्रह), मातीला पंख फुटताना (कादंबरी), नाही गिरवता येत कुटलीच लिपी (कविता संग्रह) आदी पुस्तके आजवर प्रसिद्ध आहेत. 

या सर्व साहित्यकृतींना अनेक कवी, साहित्याचे राज्यस्तरीय पुरस्कार लाभलेले आहेत.

✨ समाविष्ट साहित्यकृती

✨ शोध सुखाचा' - ललित लेख संग्रह

✨ 'झोका' - बालकविता

✨ गमंत गाणी' - बालकविता संग्रह

✨ मातीला पंख फुटताना' - कादंबरी

✨ नाही गिरवता येत कुटलीच लिपी' - कविता संग्रह

*****


To Top