✨ आमदार देवेंद्र कोठे यांची विशेष उपस्थिती;
✨ रुग्णसेवक आनंद गोसकी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक
✨ उपक्रमशील समाजकार्याची गेल्या 09 वर्षांपासूनची परंपरा कायम
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून 'जनआधार फाउंडेशन' च्या वतीने 22 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 456 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्ती आणि उत्स्फूर्तपणे रक्तदान करीत उपक्रमशील समाजकार्याची गेल्या 09 वर्षांपासूनची परंपरा कायम राखली.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 09 वर्षांपासून जनआधार फाउंडेशनच्या वतीने वाढदिवसाचे औचित्य साधून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जात आले आहेत. 
यंदाच्या वर्षीही आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला सोलापूरकर नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला सोलापूर शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे यांनी विशेष भेट देऊन या उपक्रमाचं कौतुक केले.
"रुग्णसेवक आनंद गोसकी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय मदतीद्वारे हजारो गरजू रुग्णांना सातत्याने मोलाचा आधार देत आहेत," असे सांगत त्यांच्या रुग्णसेवेचे आणि सामाजिक कार्याचं आमदार कोठे यांनी, मनापासून कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या निमित्ताने होर्डिंग्ज किंवा अनावश्यक खर्चाला पूर्णपणे फाटा देऊन, थेट समाजातील गरजू रुग्णांचे प्राण वाचवणारा आणि आरोग्यदायी ठरणारा उपक्रम राबवल्याबद्दल सोलापूरच्या नागरिकांतून आनंद गोसकी यांच्या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.
या शिबिरास जनआधार फाउंडेशनचे महेश दासी, श्रीकांत येमुल, दिनेश श्रीकोंडा, रोहित यादव, वीरेंद्र क्षीरसागर, पुरुषोत्तम वग्गा, विराज वग्गा, अनिल गणपा, अमर गंगुल, श्याम कोटा, दिनेश सुरा, नवीन फुलपाठी, श्रीकांत शिंदे, ऋषिकेश चिलवेरी, किरण आंबट, नंदकिशोर कनकुंटला, निखिल येमूल आणि स्वप्निल गुंडला यांच्यासह परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, रुग्णसेवक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. या शिबिरात संकलित करण्याकरिता 'सिद्धेश्वर ब्लड बँक' यांच्या वैद्यकीय टीमने परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी, शिबिरात हिरिरीने सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे, सिद्धेश्वर ब्लड बँकेचे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे, तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
याप्रसंगी रुग्णसेवक आनंद गोसकी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोलापुरकरांच्यावतीने कृतिशील उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या स्नेहपूर्वक शुभेच्छा दिल्या.
