रस्त्यांची 80 टक्के कामे पूर्णत्वास... ! येत्या काळात उर्वरित रस्ते आणि पाणंद रस्त्यांची कामेही होतील पूर्ण : आमदार कल्याणशेट्टी

shivrajya patra

सोलापूर : आपल्या मतदारसंघात करत असताना, 05 टर्म मिळाल्या तरी रस्त्यांची सुधारणा होईल की नाही, असं वाटत असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे 80 टक्के रस्त्यांची कामे पूर्णत्वास गेली आहेत. येत्या काळात उर्वरित रस्ते आणि शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक पाणंद रस्त्यांची कामं पूर्ण केली जातील, असं प्रतिपादन अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आणि माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य स्वर्गीय श्रीकांत उपाख्य बप्पा वाडकर यांच्या 30 व्या स्मृतिदिनानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव इथं सरपंच यशपाल वाडकर यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होते. याप्रसंगी आमदार कल्याणशेट्टी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमात माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य श्रीकांत उर्फ बप्पा वाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर दीपप्रज्वलनानं अभिष्टचिंतन सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार, उपसरपंच शहाजहान शेख, शिवराज जाधव, सरपंच प्रशांत जाधव (गंगेवाडी), उपसरपंच धनाजी काळे (गंगेवाडी), मधुकर चिवरे, सुभाष फंड, संभाजी जाधव, सरपंच अंबिका कोळी (ऊळेगांव), मल्लिनाथ येणगुरे, बालाजी येणगुरे, प्रविण चौगुले, राजश्री येणगुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी सरपंच यशपाल वाडकर यांनी आपल्या प्रास्ताविकात, श्रीकांत उपाख्य बप्पा वाडकर यांच्या राजकीय पटलावरील आठवणींना उजाळा दिला. त्यांचा या भागाचं उदयोन्मुख नेतृत्व असा उल्लेख करून, त्यांच्या स्वप्नातील विकसीत परिसराचं चित्र साकारण्याचा प्रयत्न होतो आहे. कासेगांव जोडणारे आजवर दुर्लक्षित असलेले अनेक रस्ते पूर्णत्वास गेलेले आहेत, उर्वरित रस्त्यांची कामं आमदार कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण व्हावीत, असंही म्हटले.

तत्पूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते कासेगांव-ऊळेगांव रस्त्यावर कासेगांव नदीवर नव्यानं बांधण्यात येत असलेल्या पूलाजवळ वृक्षारोपण करण्यात आलं. त्यानंतर विचारपीठावर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,

आयुष्यमान भारत कार्ड शिबीर, मोफत ST. सवलत कार्ड, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, मेघराज पंडीत सरसंबे यांची राज्य कुस्ती असोसिएशनच्या पंच म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कुलश्रेष्ठ महिला कृषि उत्पादक कंपनीच्या वतीने महिला बचत गट सदस्यांना  प्रातिनिधीक स्वरुपात केशर आंब्यांच्या रोपट्यांचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत 1100 रोपट्यांचं वाटप करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

राजकीय पटलावर कार्य करीत असताना, आरोप-प्रत्यारोप होत राहतात. मी त्यास फारसं महत्व न देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा प्रतिनिधी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना या परिसरातील उर्वरित विकास कामे पूर्ण करूयात, या शब्दांत आमदार कल्याणशेट्टी यांनी उपस्थितांना आश्वासित केले. 

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदिप क्षिरसागर यांनी केले तर शेवटी ज्ञानेश्वर कदम यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केलं.

... चौकट ....

... यांचा झाला गौरव !

यावेळी कासेगाव जिल्हा परिषद शाळेतील ITS प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केलेल्या 11 गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तरुणांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण भोजणे (रुग्णसेवा), प्रांजल शंकर चौगुले (शैक्षणिक), प्रज्वल शाम जोशी (शैक्षणिक), मेघराज पंडित सरसंबे (क्रीडा) आणि सिद्धार्थ चंद्रकांत कुलकर्णी (शैक्षणिक) यांचा समावेश होता.

To Top