फोन पे वर लाच स्विकारल्याच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न; तलाठ्यानंतर मंडळ अधिकारीही गजाआड

shivrajya patra

                                     (प्रतिकात्मक छायाचित्र : ChatGPT)

सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी प्रत्येकी 33 हजार रुपयांची लाच रक्कमेची मागणी करुन प्रत्यक्षात 89 हजार रूपये फोन पे वर स्विकारल्याच्या गुन्ह्यात तलाठ्याबरोबर मंडळ अधिकाऱ्याचा सहभाग निष्पन्न झालं आहे. या गुन्ह्यात मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांना, गुरुवारी गजाआड करण्यात आलंय.

वाफळे येथील फोन पेच्या माध्यमातून ऑनलाईन लाच स्विकारल्याच्या बहुचर्चित प्रकरणात सोलापूर ग्रामीणकडील माढा पोलीस ठाण्यात, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलम 7, 7 A प्रमाणे 29 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील लोकसेवक तलाठी सुदर्शन रमेश जाधव (वय- 30 वर्षे, पद वर्ग- 3, नेम. सजा वाफळे, राहणार विठ्ठलवाडी, ता. माढा.) यांच्याविरूध्द प्राप्त लाच मागणीचे तक्रारीवरून करण्यात आलेल्या पडताळणी व यशस्वी सापळा यापूर्वीच कारवाई झालीय.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये या गुन्ह्यातील अटक आरोपी तलाठी सुदर्शन जाधव आणि संशयित आरोपी मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांनी पडताळणी कारवाई पूर्वी, 27 मार्च रोजी रात्री मोहोळ तालुक्यातील मौजे वाफळे गावातील चौकामध्ये तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर साक्षीदार यांच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर साक्षीदार यांचेकडून प्रत्येकी 33, 000 रुपये असे तिन्ही ट्रॅक्टरचे मिळुन 99, 000 रुपये मागणी केली.

त्या रक्कमेतील इतरांचे फोन पे वर 89, 000 रुपये घेऊन सदरची ऑनलाईन रक्कम इतर साक्षीदार यांच्या खात्यावरुन साक्षीदार यांचे खात्यावर वर्ग करण्यास सांगून त्यांच्याकडून रोख स्वरुपात 89, 000 रुपये रक्कम स्विकारलेली आहे. यावरुन हा गुन्हा दाखल झालेला आहे.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडे तपास करुन आरोपीविरुध्द पुरावा गोळा केला असून 27 आणि 28 मार्च रोजीचे तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारण्यामध्ये तलाठी सुदर्शन जाधव यांच्यासोबत अनगरचे मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झालं आहे.

त्यामुळे मोहोळ तालुक्यातील अनगर येथील मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांना आरोपी करण्यात आलेलं असून या आरोपीस गुरुवारी, 23 जुलै रोजी अटक करण्यात आलेली आहे.

... नागरिकांना आवाहन !
लोकसेवक शासकिय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकिय काम करुन देण्यासाठी कायदेशीर फि व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करित असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक प्रशांत चौगुले (ए.सी.बी., सोलापूर मो. क्र. 9823225465) यांनी केलं आहे.

संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज, रंगभवन चौक, सोलापूर.

संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in

ई मेल- www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप- acbmaharashtra.net
टोल फ्री क्रमांक- 1064
दूरध्वनी क्रमांक- 0217-2312668
व्हॉटस अॅप क्रमांक- 9404001064

***

To Top