पोलीस आयुक्तालय आणि RBL बँकेच्या संयुक्त उपक्रमात 1125 जणांची तपासणी

shivrajya patra

                                                         (photo : chatgpt)

पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि कुटुंबियांचा आरोग्य चिकित्सा शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : येथील पोलीस आयुक्तालय आणि RBL बँकेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरास आयोजित  करण्यात आले होते. शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य चिकित्सा शिबीरात दोन दिवसात 1125 तपासणी करण्यात आली. 

पोलीस आयुक्तालय व आरबीएल बँकेच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी अंतर्गत शुक्रवारी, 19 आणि 20 जून रोजी सोलापूर पोलीस मुख्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

या आरोग्य शिबीराचे उद्घाटन पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) सौ. वृष्टी जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) प्रीतम यावलकर यांच्यासह अन्य वरीष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. सकाळी 09.00 वा. ते सायंकाळी 05.00 वा. दरम्यान पार पडलेल्या शिबीराचा लाभ पोलीस अधिकारी, अमंलदार व त्यांच्या कुंटुबीयांनी घेतला. 

या शिबीरामध्ये सीबीसी, ब्लड शुगर, टोटल कोलेस्ट्रॉल, थायरॉईड व्हीटामिन बी/12, डी/3 तसेच बीपी अशा विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यामुळे पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयाना त्यांच्या आरोग्याची माहिती मिळाली तसेच संभाव्य आरोग्य समस्यांचे वेळेत निदान होण्यास मदत झाली.

पोलीस कर्मचारी-अधिकारी यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या शिबीरामध्ये सुमारे  1125 पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, असे मत उपस्थित अंमल अधिकारी यांनी व्यक्त केले.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आरबीएल बँकेचे व्यवस्थापक, त्यांचे सहकारी तसेच पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथील मानव संसाधन विकास विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

To Top