सोलापूर : जागेवर बेकायदेशीर कब्जा करुन चाँद मदार छप्परबंद आणि त्याच्या कुटुंबास पिरंगे भावंडांकडून सतत मारहाण केली जातेय. उभयतांकडून छप्परबंद कुटुंबाविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करून नाहक मानसिक त्रास दिला जात असल्याच्या निषेधार्थ छपरबंद कुटुंबानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरु केलंय. 

संजय गांधी नगर, 2 नंबर झोपडपट्टीमधील रहिवासी असलेल्या चाँद मदार छपरबंद यांची जागा बळकाविलेले राजु उल्हास पिरंगे आणि विजय उल्हास पिरंगे यांनी पोलिसांकडं खोट्या तक्रारी दाखल करण्याच्या धमक्या देऊन संपूर्ण छपरबंद कुटुंबाला मानसिक आणि शारिरीक त्रास देत आहेत. 
या सततच्या त्रासाला कंटाळून छपरबंद कुटुंबियांनी मंगळवारी, 16 जून रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू केलंय. उभयतांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांनी बेकायदेशीररित्या बळकावलेली जागा त्यांना परत देण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
