शासनाच्या सर्व योजना बांधकाम कामगारांपर्यंत सुलभपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार : मंगेश झोले

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्र शासनाने सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्तपदी कायमस्वरूपी नियुक्ती केल्याबद्दल मंगेश झोले यांचे बांधकाम कामगार क्षेत्रातील सर्व कामगार संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. बांधकाम कामगारांसाठीच्या शासनाच्या सर्व योजना सहज आणि सुलभ पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन नूतन सहा. कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले.

सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त हे पद गेल्या काही कालावधीपासून रिक्त होतं. या पदावर कायमस्वरूपी अधिकाराची नियुक्ती करावी, अशी मागणी सर्व कामगार संघटनेचे वतीने शासनाकडे वारंवार करण्यात आली  होती. 

त्यानुसार गेल्या काही महिन्यापासून प्रभारी असलेले सहाय्यक कामगार आयुक्त  मंगेश झोले यांची महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी नियुक्ती केली आहे. या पित्यर्थ बांधकाम कामगार क्षेत्रात सर्व कामगार संघटनांनी संयुक्तपणे मंगेश झोले यांचा मानाची शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.



याप्रसमहाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी, बांधकाम कामगार संघर्ष समितीचे सोहेल शेख, संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव, बालाजी चराटे, विठ्ठल कुऱ्हाडकर, कबीर तांडूरे, संदीप धोत्रे, रेखा आडकी, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, भारत देवकुळे यांच्यासह कामगार बंधू-भगिनी उपस्थित होत्या.


To Top