विशालनगर गणेशोत्सव मंडळाच्या यंदाच्या गणेशोत्सवाचा सामाजिक कार्यानं प्रारंभ

shivrajya patra

उत्सवातील डॉल्बी, डिजिटलला फाटा; 14 वर्षात 10 लाखांच्या शैक्षणिक साहित्याचं वाटप 

सोलापूर : लोकमान्य टिळक यांनी ज्या हेतूने गणेशोत्सवाची स्थापना केली. तो हेतू साध्य करण्याचा प्रयत्न अनेक मंडळे करत असतात. त्यातीलच एक मंडळ म्हणजे जुळे सोलापुरातील विशालनगर गणेशोत्सव मंडळ आहे. गणेशोत्सवात डॉल्बी, डिजिटल व स्क्रीनच्या वायफळ खर्चाला फाटा देण्यातून आणि समाजातील दानशूर व्यक्तीच्या देणगीतून गेल्या चौदा वर्षांपासून गरजू मुला-मुलींना वर्षभरासाठी लागणाऱ्या शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील जि. प. शाळा, बिरोबा वस्ती येथून यंदा उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. 

या कार्यक्रमास सी.ए. प्रतीक शिरसीकर, सी.ए. सौरभ बुडुख, अंकुर येळीकर, अॅड. निनाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ. सुरेखा चौगुले, तंटामुक्त समिती अध्यक्ष संजय पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील आवताडे, शाळा सुधार समिती अध्यक्ष तुकाराम जाधव, विश्वजीत चौगुले, मुख्याध्यापक राजशेखर बुरकुले, सुखदेव वाघमारे उपस्थित होते.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना एक रेघी, दुरेघी चार रेघी, चौकटी वही, चित्रकला वही, रंग खडू, कंपास, पाटी, पेन्सिल, खोडरबर आणि पेन असं वर्षभर पुरेल इतकं सर्व प्रकारचे 15 हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

याप्रसंगी मंडळाचे मयूर पानकर, अक्षय कल्याणी, सुमीत कट्टे, महेश जोडमोटे, शैलेश जाधव, समर्थ गौडगाव, अमोल चिट्टे, निपुण कवठेकर, सूरज नदाफ, रोहन मेंगजी, सारंग कुलकर्णी, सुयश बिराजदार, यश उंबरजे, मानस कडगंची व मंदार छत्रे आदी कार्यकर्ते परिश्रम घेतात.

फोटो ओळी : विशालनगर गणेशोत्सव मंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करताना सीए प्रतीक शिरसीकर, सीए सौरभ बुडुख, अंकुर येळीकर, अॅड. निनाद पाटील, सुरेखा चौगुले, संजय पवार, सुनील आवताडे, तुकाराम जाधव, विश्वजीत चौगुले, राजशेखर बुरकुले आणि सुखदेव वाघमारे छायाचित्रात दिसत आहेत.

..... चौकट ...

विशालनगर गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवातील वायफळ खर्चाला फाटा देण्याचा निर्णय घेतला. त्यातून गेल्या 14 वर्षापासून वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण या क्षेत्रातील उपक्रम घेण्यात येतात. अशा प्रकारच्या उपक्रमातून मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य एक प्रकारचा वेगळा आनंद जातं. 

सी.ए. प्रतीक सिरसीकर

To Top