'वर्ल्ड ऑफ विडोज' संस्थेच्या वतीने एकल महिला दिवस साजरा

shivrajya patra

सोलापूर : शासनाने एकल महिला दिवस साजरा करण्याचे जाहीर केले. त्यानुसार वर्ल्ड ऑफ विडोज या संस्थेच्यावतीने महापालिका हिरवळीवर एकल महिला दिवस साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून अनेक एकल महिलांचा हळदी-कुंकू लावून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात श्रीमती आबेदा नीलमेघम यांचाही खास सत्कार केला. त्यांनी आपल्या दोन मुलांना उच्च शिक्षण देऊन चांगल्या पदापर्यंत पोहोचवलं आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे.

यावेळी सायरा शेख, लता ढेरे, मार्था आसादे, शोभा गायकवाड, शबाना मुलाणी, मोनिका सरकार, शशिकला कस्पटे, शारदा मसुती, पुष्पा हलकूड, स्वाती मुकणार, लक्ष्मी माने, कांचन चौगुले आदी महिला उपस्थित होत्या.

शब्दभार : बिराजदार सी. ए., सोलापूर.


To Top