सोलापूर : विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडविण्याच्याबरोबर त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने मजरेवाडी परिसरातील बेडर कनय्या नगरातील श्री गणेश तरुण मंडळ, यांच्या वतीने रविवारी सायंकाळी इयत्ता 01 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
अलिकडं वाढदिवस, सत्कार सोहळे आणि अन्य कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा कल वाढीस लागला आहे. अशा वायफळ खर्चाला फाटा देत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी थेट उपयोगी पडेल असा उपक्रम राबवून श्री गणेश तरुण मंडळाने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
विद्यार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या स्कूल बॅग, वह्या, पेन, नोटबुक तसेच मेडल देऊन रविवारी, त्यांचा गौरव करण्यात आला. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असून त्यांना अभ्यासात अधिक प्रेरणा मिळणार आहे.
या कार्यक्रमाला श्रीमती सुनिता सुनील कामाठी, सौ. कल्पना संतोष कदम, भारतसिंग बडुरवाले, रवी कैय्यावाले, वैभव हत्तुरे, तुषार पवार, ज्ञानेश्वर भोसले, शाम धुरी, बाबुराव जमादार, महादेव यरनाळ, राजेश झंपले, सूर्यकांत हनुमाने, सौ. हिरा अंबादास गुजले, चंद्रकांत कडूशिणी आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी पर्यावरण संवर्धनाचा देण्यासाठी प्रमुख अतिथींना तुळशीचं रोपटं भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तुळशीचं धार्मिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक महत्त्व लक्षात घेऊन हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी आपल्या समायोचित संदेशपूर्ण भाषणात श्री गणेश तरुण मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमात लोकशाही न्यूज 24 आणि लोकशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीमराजा बागवान अणि उपस्थित सर्व अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल, नोटबुक, पेन व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संयोजक अशोक झंपले, अमोल भोसले, विशाल झंपले, भारत झंपले, अशोक मुमुडले, सागर झंपले, विनोद भोसले, संतोष मिंगुळे, विशाल बेरुणगेकर, शाकिर बाशा जमादार, रिजवान शेख, प्रविण वाघमोडे, राकेश बेगालल्लू, विक्रम सामोरे, अकबर कुरेशी, ओंकार कोळी, आकाश माने, रोहित झंपले, भिमण्णा नायकवाडी, श्रेयश गाडे, सोनू धांडे, अभिषेक मुमुडले, नितीन गुजले, शुभम वानकर यांच्यासह श्री गणेश तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
****
