डॉ. गायत्रीचं यश समाजासाठी प्रेरणादायी : महेश पंडीत

shivrajya patra

मोहोळ/तालुका प्रतिनिधी : सोनार समाजात आजही पदवीधर शिक्षणाची वाणवा आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, कठोर परिश्रम आणि समर्पण या जोरावर कु. गायत्री दीक्षित हिने एम. बी. बी. एस. शिक्षण पूर्ण करून डॉक्टर पदवी मिळविली. त्यामुळे गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे, असं गौरवोद्‌गार श्री संत नरहरी बहुउद्देशीय संस्था मंडळाचे अध्यक्ष महेश पंडित यांनी काढले. 

नागनाथ विद्यालयाचे आदर्श कलाशिक्षक दिलीप दीक्षित यांची गायत्री ही सुकन्या आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पदनकुमार दीक्षित (निवृत्त नायब तहसिलदार) यांचे हस्ते गायत्री आणि तिच्या आई वडिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला. ते सत्कार समारंभ प्रसंगी महेश पंडित बोलत होते .

डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील मेडीकल कॉलेज, अहिल्यानगर येथे गायत्रीचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले. उपस्थितांनी डॉ. गायत्रीचे कौतुक करून तिला पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी  निवृत्ती महामुनी,  विजयकुमार दीक्षित,अनिरुद्ध क्षीरसागर, प्रमोद दीक्षित, प्रा. अशोक वेदपाठक, राजेश दीक्षित,सचिन महामुनी, प्राचार्य  पी. एस. शिंदे, तालुका क्रीडा समन्वयक प्रा. संभाजी चव्हाण, माने, उबाळे, बोराडे मित्र परिवार व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top