सोलापूर: महाराष्ट्र शासन दडपशाहीने लादत असलेल्या अनुसूचित जातीच्या 13 टक्के आरक्षणाचे अ ब क ड मध्ये उपवर्गीकरण करून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या कांही जात समूहामध्ये राज्याच्या फडणवीस सरकारने जातीय तेढ निर्माण केल्याने सामाजिक सलोख्याला तडा जात आहे. या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध दर्शविण्यासाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
आरक्षणातील अबकड उपवर्गीकरणाला विरोध दर्शविणे आणि उपवर्गीकरणाचाविरूध्दचा लढा तीव्र करण्याच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनुसूचित जातीच्या अन्य जात समूह घटकांनी उपवर्गीकरणाला यापूर्वीपासून तीव्र विरोध केला आहे. 
महाराष्ट्र राज्यात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनआंदोलने होत आहेत, याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या जात घटक समुहांमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी 21 जून रोजी दुपारी कामगार शक्ती युनियन, कार्यालय, प्राथमिक शिक्षण मंडळ, नवी पेठ येथील कार्यालयात पार पडली.
या बैठकीला भविष्यात अनुसूचित जातीमधील जात समूह घटकांच्या संविधानात तरतुदी केलेल्या हक्काच्या आरक्षणातील अ ब क ड उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी म्हणून सार्वजनिक जनआंदोलन उभे करण्यात येणार आहे. या आंदोलनाची पुढील दिशा करण्याकरिता पुढील बैठक रविवारी, 28 जून सार्वजनिक बैठक घेण्याचे उपस्थितांनी सर्वानुमते ठरविले.
या बैठकीमध्ये अनुसूचित जातीच्या जात समूह आणि त्यांच्या सामाजिक संघटना, तसेच पक्षनिहाय पदाधिकारी आणि ज्येष्ठ अनुभवी प्रमुख मान्यवरांची उपस्थित होती.
यामध्ये रिपब्लिकन चळवळीतील अनुभवी व जुने ज्येष्ठ पॅन्थर जनार्दन शिंदे, आंबेडकरी चळवळीतील जिल्हा परिषदचे माजी सदस्य पँथर आर. के. कांबळे, साप्ताहिक रिपब्लिकन एक्सप्रेसचे मुख्य संपादक पॅंथर श्याम शिरसागर, विठ्ठल व्हनमारे, रविकांत राजणीकर, युवराज पवार, मातंग समाज कृती समितीचे शहराध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. शैलेश पोटफोडे, रमेश बोराडे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस पॅंथर राजा सोनकांबळे, आरक्षण हक्क कृती समितीचे जिल्हा समन्वयक कमलाकर बनसोडे, रविदास परिषदेचे अध्यक्ष बाबुराव इंगळे, अनुसूचित जाती जनजाती रेल्वे कर्मचारी युनियनचे अध्यक्ष टी. ए. लोहार, कुमार चन्ना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिक आठवले, अखिल भारतीय शाख्य संघाचे अध्यक्ष अशोककुमार दिलपाक, वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध वाघमारे, शहर सरचिटणीस विनोद इंगळे,
भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, राज्य सचिव संजय रणदिवे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मनीष सुरवसे, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अरुण क्षीरसागर, बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण कांबळे, काँग्रेस (आय) चे सोलापूर शहर सरचिटणीस गौतम मसलखांब, बौद्ध उपासक विजयानंद भालशंकर, भारतीय बौद्ध महासभेचे युवा अध्यक्ष अमित रा. गायकवाड, चर्मकार महासंघाचे बापू चाबुकस्वार, किरण खरात, जनार्दन मोरे, विश्वास गायकवाड, नागेश इंगळे, हरिदास वाघमारे, रमेश बोराडे यांच्यासह अनुसूचित प्रवर्गात मोडणाऱ्या जात घटक समुहातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजा सोनकांबळे यांनी करून बैठकीचे उद्दिष्ट सांगितले तर सरतेशेवटी युवराज पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
