सोलापूर : पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने साप्ताहिक 'सोलापूर क्रांती' चे संपादक मिलिंद प्रक्षाळे आणि 'जय हो' चे संपादक विजयकुमार उघडे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याचं आयोजन करून उभयतांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं. यावेळी शाल, टोपी व पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. 
पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचं उल्लेखनीय योगदान, कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि जनहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव उपस्थितांनी केला. त्यांच्या पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक यश लाभावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी मिलिंद प्रक्षाळे आणि विजयकुमार उघडे यांच्या समाजाभिमुख आणि जनहिताच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यावर शुभेच्छा दिल्या. 
तिसरी आँख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
याप्रसंगी पत्रकार इक्बाल शेख, इम्तियाज अक्कलकोटे, अशोक ढोणे, नितीन करजोळे, लतीफ नदाफ, सिद्धाराम नंदर्गी, गिरमल्ला गुरव, अक्षय बबलाद, बजरंग जाधव, वैजनाथ बिराजदार, अस्लम नदाफ, अकबर शेख, प्रविण पारवे, मनोज राठोड, जहिर नदाफ, महेश जाधव, दयानंद बनसोडे, यशवंत फडतरे,आबा तळभंडारे, सुरज रजपुत, प्रशांत गायकवाड, सिद्धू पुजारी, अरीब बिलाल,
सुधीर डोळ्ळे, ऋषिकेश ढेरे, शाहिद शेख, भिमा वारे, संगीता बिराजदार, नितीन बनसोडे, बसू स्वामी, प्रकाश जावळे, प्रशांत दिलपाक, तांबोळी, अजय हिरेमठ, प्रशांत बनसोडे यांच्यासह अप्पाश्री मित्र परिवाराचे सदस्य, पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
