जमादार टोळी शहर आणि उर्वरीत सोलापूर जिल्ह्यातून तडीपार

shivrajya patra

सोलापूर : टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखापत, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा, जीवे ठार मारण्याची धमकी देणे आणि घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या टोळी प्रमुख राजू मोहन जमादार याच्यासह 05 जणांना पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर यांनी सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलंय.

जमादार आणि त्यांच्या टोळीतील पाच सदस्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून पोलीस उप-आयुक्त प्रीतम यावलकर यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.या सर्वांविरुध्द सन 2023, 2024 आणि 2025 या कालावधीमध्ये उपरोक्त गुन्हे दाखल होते, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर यांनी टोळी प्रमुख राजू मोहन जमादार (वय-41 वर्षे), कृष्णा राजू जमादार (वय-20 वर्षे, दोघे रा. प्लॉट नं. 49, हुच्चेश्वर नगर भाग-3, कुमठा नाका, सोलापूर),

दिपक रामशंकर जमादार (वय-19 वर्षे, रा. 27, महाराणा प्रताप झोपडपट्टी, कुमठा नाका, सोलापूर सध्या शिवगंगा नगर भाग-4, पारशी विहीरजवळ, कुमठा नाका, सोलापूर), सनी राम जमादार, वय-20 वर्षे) आणि राम शंकर जमादार (वय-43 वर्षे, दोघे रा. हुच्चेश्वर नगर मठ भाग-3, कुमठा नाका, सोलापूर) यांना सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपारीचे आदेश पारित केले.

To Top