सोलापूर : नुतन खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रबोधन विचार मंच, सोलापूर यांच्या वतीने औसे वस्ती आमराई परिसरातील रमाई चौक इथं करंजी, सिताफळ, मोगरा, शेवगा, चिंच आणि जांभूळ रोपट्यांचं वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आयु. डॉ. ज्योती वाघमारे (राज्यसभा खासदार) भीमराज कि बेटी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, अशी मंगल कामना उपस्थितांनी व्यक्त करून त्यांचं अभिष्टचिंतन केलं.
याप्रसंगी आयु. विश्वास गायकवाड, आयु. अशोककुमार दिलपाक यांनी सध्याच्या परिस्थितीत झाडे लावण्याचे महत्त्व सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक झाड तरी लावले पाहिजे. झाडे आपणास ऑक्सिजन वायू पुरवतात, तसेच झाडांची आपणास सावली- फळे मिळतात, झाडावर चिमणी पाखरे येऊन बसतात, त्यांच्या आवाजाचा किलबिलाट एकूण मन प्रसन्न होतं, झाडे लावल्यामुळे पावसाचे प्रमाण वाढते याप्रकारे त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंच चे अध्यक्ष विश्वास गायकवाड, शाक्य संघांचे अशोककुमार दिलपाक (नियोजित - शाक्य संघ, संघटक, सल्लागार सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य), नागेश गायकवाड (" शाक्य ", सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सोलापूर) चे सभासद), आयु. ऋषिकेश माळशिखरे, किरण मोरे, नारायण दुपारगुडे, आयु. श्रीकांत कांबळे, आयु .अलका गेजगे, कसबे मावशी व महापालिका आरोग्य विभागाचे प्रभाग 10 चे अधिकारी आयु. श्रीकांत विभुते, प्रबोधन गायकवाड, आयु. आदित्य नडगम आदी नागरिक उपस्थित होते.
