सोनाराच्या दुकानात चोरी ! स्थानिक गुन्हे शाखेच्या उल्लेखनीय कामगिरी महिलेसह दोघे गजाआड

shivrajya patra

सोलापूर : सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या अंतर जिल्हा दोन सराईत आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. या उल्लेखनिय कामगिरीत बार्शी शहर पोलीस ठाणेसह परांडा पोलीस ठाणेकडील 02 गुन्हे उघड झाले आहेत. श्रीमती कोमल विनोद राठोड आणि लखन चंदर पवार अशी नांवे असून उभयतांकडून  9.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक 04 चाकी वाहनासह  8,40,000 रुपये किंमतीचा मु‌द्देमाल हस्तगत करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यात चोरी-घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबतच्या सूचना गुन्हा आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिल्या होत्या. 

त्यानुसार पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून गुन्हे उघड करण्यासंबंधी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याकामी आदेशीत केलं होते.

17 मे रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत सराफ दुकान हळद गल्ली येथे दोन अज्ञात चोरट्यानी सोनार दुकानातून हात चलाखीने सोन्याचे दागिणे चोरून नेले होते. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस निरीक्षक, संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विजय शिंदे व त्यांचे पथक करीत होते.

पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हा गुन्हा रेकॉर्डवरील श्रीमती कोमल विनोद राठोड आणि लखन चंदर पवार यांनी केल्याचे समजले. या गुन्ह्यातील आरोपी पुणे येथे असल्याचे समजल्याने पोलीस निरीक्षक, संजय जगताप यांना कळवून स.पो.नि. शिंदे आणि त्यांचे पोलीस पथक, महिला अंमलदारसह पुण्याकडे रवाना झाले.

महिला आरोपी श्रीमती कोमल विनोद राठोड (वय- 45 वर्षे, रा- इंदिरा नगर अप्पर, व्हीआटी कॉलेज शेजारी, क्यु-17, पुणे) आणि तिचा साथीदार लखन चंदर पवार (वय-30 वर्षे, रा- खोपडे नगर, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज, पुणे-46) हे दोघे संतोष नगर, अंबेगाव कात्रज, पुणे येथे असल्याची माहिती मिळाली.

उभयतांना सापळा रचून ताब्यात घेतले. या आरोपींकडे तपास करता, त्यांनी संगनमताने बार्शी येथील गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन कसून तपास करताना, त्यांनी त्याच दिवशी, धाराशिव जिल्ह्यातील परांडा पोलीस ठाण्याकडील चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. 

या गुन्ह्यातील आरोपींकडून 9.50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली 1 होंडा सिटी चार चाकी वाहन असा एकूण 8, 40,  000 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन्ही आरोपींना बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि पथकातील श्रेणीपोउपनि/श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ/सलीम बागवान, रवि माने, आश्विनी गोटे, पोकॉ अन्वर अत्तार, मनोज राठोड, सुरज रामगुडे, विनायक घोरपडे, मपोकॉ सुनंदा झळके, चापोकॉ आशुतोष जाधव यांनी बजावली.


To Top