बकरी ईदचं निमित्त ! 86 आरोपींवर प्रतिबंधक कारवाई; एका आरोपीची कारागृहात रवानगी

shivrajya patra

सोलापूर : बकरी ईद-२०२६ च्या अनुषंगाने मागील एका वर्षात गोवंश हत्या, तस्करी, वाहतूक इत्यादी संबंधित असलेल्या दाखल गुन्ह्यातील 86 आरोपींवर पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली.

या आरोपींपैकी  04 आरोपींना भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 163 (2) प्रमाणे 08 दिवसांकरीता शहर हद्दीतून बाहेर केले आहे. तसेच नमुद गुन्ह्यातील 02 आरोपीतांनी बंधपत्राचे उल्लंघन केल्याने त्यापैकी एका आरोपीची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलीय. 

अन्य एका आरोपीकडून 25 हजार रुपये दंड आकारुन तो शासन जमा केला असल्याचेही पोउपआ.(परिमंडळ) कार्यालयाकडील वाचक अधिकारी पोउपनि विक्रम रजपूत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

To Top