खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात; सर्वजण सुखरूप

shivrajya patra

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. मुंबई-पुणे मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. गाडीतील सर्वजण सुखरूप आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिलीय. यानंतर रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घ्या, असं आवाहन करताना त्यांनी हा कटू अनुभव सोशल मिडीयाच्या एक्स हॅंडल वर शेअर केलाय. 

सर्वजण सुखरूप

या अपघाताबाबत माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत कटू अनुभव आला. वाहन क्रमांक GJ 13 CF 5257 ने माझ्या गाडीला बाजूने जोरदार धडक दिली. सुदैवाने, सर्वजण सुखरूप आहेत.

वाहन चालवताना काळजी घ्यावी

अशा प्रकारच्या घटना ही एक गंभीर आठवण करून देतात की, आपल्या रस्त्यांवर अतिवेगाने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणा करणे, यामुळे असंख्य लोकांचे जीव धोक्यात येऊ शकतात.  मुंबई-पुणे महामार्गावर अनेक अपघात होत असतात. अनेकदा यात मोठी जीवित हानीही पहायला मिळालेली आहे. असे अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होत असतात. या अपघातात सुप्रिया सुळे यांच्या गाडीचं थोडेफार नुकसानही झाल्याचंही समजतंय. त्यामुळेच या अपघातानंतर आता सुप्रिया सुळे यांनी वाहने सावकाश चालवण्याचे व वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे. 

To Top