कुमठे प्रशालेचा निकाल 81.74 टक्के

shivrajya patra

सोलापूर : कुमठे प्रशालेने दहावी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली असून प्रशालेचा दहावी बोर्डाचा निकाल 81.74 टक्के लागला. प्रशालेमधून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी 09, प्रथम श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी 36, द्वितीय श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी 36 व  सर्वसाधारण उत्तीर्ण 22 आहेत.

प्रशालेमधून प्रथम- अनुराग फुलारी 91.00 टक्के, द्वितीय - अंकिता घोडके 90.60 टक्के व तृतिय - ऋतुजा जाधव 89.70 टक्के गुण प्राप्त करून यश प्राप्त केलं आहे.

संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीपराव माने, संस्थेचे मुख्य विश्वस्त व नगरसेवक जयकुमार माने, विश्वस्त स्वाती माने यांच्या हस्ते या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले करण्यात आले. 

याप्रसंगी प्रशाले चे प्राचार्य जयसिंग गायकवाड, पर्यवेक्षक वसंत गुंगे, लिटल स्टार च्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी पवार व मलकारी कोरे उपस्थित होते.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विजयसिंह क्षीरसागर, संजय घोडके, परमेश्वर कोळी आणि नितीनकुमार लावंड या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते.

To Top