सोलापूर : नवोदित चित्रकार स्नेहल नारायणकर आणि गोरख निंबाळकर यांच्या आर्ट व्हेंचर चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी,08 मे रोजी पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील डफरीन चौकातील पु. ना. गाडगीळ येथे आयोजित या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अभय दिवाणजी, नगरसेवक रमेश व्हटकर, मनोहर नारायणकर, चित्रकार नितीन खिलारे, जिल्हाध्यक्ष शशिकांत सदाफुले आणि राज्य सचिव शांतप्पा काळे यांची यांची उपस्थिती होती.
पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे जितेंद्र जोशी यांनी प्रारंभी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमास सिद्धाराम नालवार, शांताराम शिंदे, वर्षा निरंजन यांचे सहकार्य लाभले. संतोष धारेराव यांनी सूत्रसंचालन केले. हे चित्र प्रदर्शन 13 मे पर्यंत सकाळी 11.00 वा. ते रात्री 08.30 वा दरम्यान सुरु राहणार आहे.
छायाचित्र :
चित्रकार स्नेहल व गोरख यांच्या पेन्सिल व पोट्रेटच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी पोलिस उपायुक्त विजय कबाडे, अभय दिवाणजी व मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.
