त्यांच्या पश्चात पत्नी (पत्रकार व सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पेण तालुका)अवंतिका म्हात्रे, दोन मुली, एक मुलगा व इतर नातलग असा परिवार आहे.
"शब्दांची लेखणी विसावली, विचारांचा सूर्य मावळला... "
सुरेश म्हात्रे यांची एक निर्भीड पत्रकार, सच्चा विचारवंत अशी ओळख होती.
त्यांनी आपल्या लेखणीतून केवल बातम्या लिहिल्या नाहीत, तर समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला . समाजातील अन्यायाविरुद्ध त्यांची लेखणी तलवारीपेक्षा धारदार होती. जनतेच्या समस्या शासन -प्रशासन दरबारी पोहचवून प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यायचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहिला . सत्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांच्या वेदनेला वाचा फोडणारा तो आवाज आज कायमचा शांत झाला आहे.
त्यांचा उत्तरकार्य विधी- दशक्रिया विधी शनिवारी, 16 मे रोजी उद्धर-पाली येथे होईल, तर तेरावा विधी मंगळवारी, 19 मे रोजी राहत्या घरी गडब, काराव पेण येथे होईल, असं त्यांच्या कुटुंबियांकडून कळविण्यात आलं आहे.
