दक्षिण सोलापूर / रमजान मुलाणी : तालुक्यातील ऊळेगाव येथे संजय विठ्ठल शिंदे (वय वर्षे 54, राहणार शिवाजीनगर, ऊळे) याची निर्घृण हत्या झालीय. ही खळबळजनक घटना आज शुक्रवारी पहाटे 01 ते 04 वाजण्याच्या दरम्यान घडलीय. अज्ञातानं अज्ञात कारणावरून अज्ञात शस्त्रानं मानेजवळ जबर वार केल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय.
घटनेची प्राथमिक माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक घोळवे, एएसआय बाणेवाले, सांजेकर अन्य पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी आली होती. संजय चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या शव विच्छेदन पाठविण्यात आलाय. 
या घटनेतील आरोपी आणि त्याचा हत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिस पथकानं चौकशी सुरू केलीय.
