चर्मकार समाज मंडळाच्या मेळाव्यात ९०० वधू-वरांची नोंदणी
सोलापूर : मुलींपेक्षा तिच्या आईच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. अपेक्षांना आवर घालून अनुरुप जोडीदार निवडला तर घटस्फोटाचा विषय राहणार नाही. बिगर हुंड्यांची लग्नं जमवा, सर्वांच्या सामुदायिक विवाहाची जबाबदारी आम्ही घेऊ, असे प्रतिपादन रायगडचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी केले.
चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने समाजातील उपवर युवक-युवती, घटस्फोटीत, विधवा, विधूर आणि दिव्यांगासाठी आयोजित केलेला वधू-वर परिचय संमेलन रविवारी,01 जून रोजी दुपारी विजापूर रोडवरील जगदीशश्री लॉन्स येथे पार पडला. या संमेलनाचे उद्घाटन भारत वाघमारे यांच्या हस्ते झाले. उपस्थित समाजबांधवांना संबोधीत करताना उद्धाटक भारत वाघमारे यांनी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, पाठबंधारे विभागाचे सेवानिवृत्त संचालक हरिदास टोणपे, प्रमुख आयोजक राजशेखर जेऊरकर, सेवानिवृत्त नगर अभियंता सुभाष सावस्कर, मल्हारी बनसोडे, दत्तात्रय शिंदे, श्रीकांत मब्रुखाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतात प्रत्येक गावात ब्राह्मण आणि लिंगायत पाठोपाठ चर्मकार समाजाचे घर आढळते. आज देशात चर्मकार सामाजाची लोकसंख्या ही 06 कोटीवर आहे. पंजांबध्ये समाज पुढारलेला आणि सदन आहे. त्यामुळे जातीचा अभिमान बाळगावा, असे सांगत यापुढे समाजासाठी वधू-वर पाठोपाठ रोजगार मेळावे घ्यावीत, असं आवाहन भारत वाघमारे यांनी समाजाच्या सध्यस्थितीवर बोलताना केले.
प्राचीन काळापासूनची विवाहसंस्था टिकली पाहिजे. पाच हजार वर्षांपूर्वी लिखित इतिहासात शिव-पार्वतीचा पहिला विवाह नोंदीत असल्याचे सांगत आज बहुतांश मुलींच्या आईचीच अपेक्षा वाढलेली दिसते. तडजोड स्विकारली पाहिजे, असं कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिदास टाेणपे यांनी अखेरीस सांगितले.
यावेळी परशुराम शिंदे, शिवपूत्र हरवाळकर, शावरप्पा वाघमारे, सुहास राजभोज, सादाशिव कांबळे, अंबादास चाबुकस्वार, रेवणसिद्ध व्हनमराठे, वामन धुळराव, सुधीर बनसोडे, दत्तात्रय हरवाळकर, अंबादास वाघमारे, शिवपूत्र तोळणुरे, संगीता शिंदे, राजश्री खडतरे, सुनिता वनस्कर, पौर्णिमा धुळराव, ज्योती बनसोडे, राजेंद्र कांबळे यांची उपस्थिती होती.
--- चौकट ---
मराठवाडासह कर्नाटकमधून वधू-वर, पालक..
या मेळाव्यात मेळाव्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून नोंदणी झाली. राज्यातून मुंबई, पुणे, सातारा, नगर, नाशिक, लातूर, धाराशिव, अकोला, बीड आणि कर्नाटकातील इंडी, विजापूर, बेळगाव, बागलकोट येथून वधू-वर आणि पालक आले होते. उदघाटन समारंभानंतर वधू-वर आणि पालकांनी परिचय करुन देत अपेक्षा व्यक्त केल्या.
------- फोटो :
सोलापूर : चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या वधू-वर परिचय संमेलनाचे उदघाटन करताना उपजिल्हाधिकारी भारत जाधव. यावेळी सुभाष सावस्कर, अंबादास वाघमारे, राजशेखर जेऊरकर, हरिदास टोणपे, शावरप्पा वाघमारे, परशुराम शिंदे, अंबादास चाबुकस्वार छायाचित्रात दिसत आहेत.
