उपस्थितांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ... जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

shivrajya patra

सोलापूर :  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे अध्यक्ष एम. एस. शर्मा,  तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी, 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.

जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करताना, तंबाखूमुळे होणाऱ्या आरोग्याच्या हानीबाबत जनजागृती करणे, हा या दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. तंबाखू सेवनामुळे हृदयाला त्रास होतो, फुफ्फुसे निकामी होतात, पक्षाघात होतो, कर्करोग आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो. दरवर्षी तंबाखू सेवनामुळे लाखो लोकांचा मत्यू होतो. त्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्रचार व प्रसार करण्यात आले आहे.

यावेळी लोकअभिरक्षक कार्यालयाचे प्र. मुख्य लोकअभिरक्षक शिव झुरळे यांच्या समवेत अॅड. सोलनकर, अॅड. म्हेत्रे व सर्व विधिज्ञ, कर्मचारी व महाराष्ट् सुरक्षा बला चे जवान यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सचिव उमेश देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक एस. ए. जी. नदाफ, तसेच कर्मचारी बाजीराव जाधवर, प्रविण विभुते, प्रसन्न गुळेद, श्रीमती काजल चव्हाण, एल. एच. शेख यांनी प्रयत्न केले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे अधिक्षक यांच्याकडून देण्यात आली.

To Top