शिवसृष्टीच्या फलकावर लघुशंका; अटकेतील दोघांना पोलीस कोठडी !

shivrajya patra

शिवभक्तांमध्ये प्रचंड संतापाची भावना

पुणे : येथील आंबेगाव बुद्रुक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित स्मारक असलेल्या शिवसृष्टी बाहेरील सूचना फलकावर लघुशंका केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या दाम्पत्याची पोलीस कोठडीत रवानगी झालीय.

मिळालेल्या माहितीनुसार, अमराळे शनिवारी, 31 मे रोजी पहाटे त्यांच्या मित्रासह नवले ब्रिजहून निघाले होते. ते शिवसृष्टीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून जात असताना तेथे दोन चार चाकी वाहने उभी असल्याचे त्यांना दिसले. त्यातील एका गाडी शेजारी पुरुष थेट सूचना फलकावर लघुशंका करीत होते, तर एक महिला शेजारी उभी होती. 

त्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधितांनी आपली ओळख सांगितली. हा सर्व प्रकार अमराळे यांनी मोबाइलमध्ये शूट केला. नंतर या निंदनीय घटनेची माहिती पोलिसांना दिली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या कृत्यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरलीय. यासंबंधी नवनाथ तुकाराम अमराळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. 

अमोल अरुण कुलकर्णी (वय-५९वर्षे, रा. धायरी) आणि त्यांची पत्नी सौ. स्नेहा (वय-५७वर्षे) अशी आरोपीतांची नांवं आहेत. पोलिसांनी दाखल गुन्ह्यात उभयतांना गजाआड केलं असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. 

भारती विद्यापीठ पोलिसांनी अमोल कुलकर्णी यांच्यासह पत्नीला अटक केलीय. अमोल मद्याच्या अंमलाखाली असल्याची प्राथमिक शक्यता वर्तविली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाम्पत्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलीय. न्यायालयात हजर केले असता, पुढील तपासासाठी कुलकर्णी दाम्पत्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगिलंय.

To Top