आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त "आधुनिक जीवनात योगाचे महत्व" या विषयावर खुली निबंध स्पर्धा

shivrajya patra

केंद्रीय संचार ब्यूरो आणि योगसाधना मंडळ सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम

सोलापूर : 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि योगसाधना मंडळ सोलापूर यांच्या तर्फे "आधुनिक जीवनात योगाचे महत्व" या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी नांव नोंदणी व स्पर्धेचे नियम व अटी समजून घेण्यासाठी सौ. रोहिणी उपळाईकर-बावने  9850040077 सौ. सीमा चेळेकर-8805573321 यांचेशी संपर्क साधावा, अशी माहिती केंद्रीय संचार ब्यूरोचे सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी दिली आहे.

स्पर्धकांनी निबंध,01 ते 07 जून रोजीपर्यंत एस. एम. पाटील, शिवस्मारक, जनता बॅंकेच्याजवळ, नवी पेठ,  सोलापूर. फोन नं. नागनाथ पाटील-988146788, महादेव पाटील-9881467686 यांचेकडे स. 10 ते 12 वाजेपर्यंत जमा करावे.

उत्कृष्ट निबंधामधून तीन बक्षिसे काढण्यात येणार आहेत. 21 जून रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या मुख्य सामुहिक योगाभ्यास कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे.

To Top