खळबळजनक... ! शिक्षण अधिकाऱ्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप

shivrajya patra

सोलापूर : माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनं एका शिक्षिकेकडं शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपानं सोमवारी जिल्हा परिषद आवारात एकच खळबळ उडाली. हा खळबळजनक प्रकार सायंकाळी 05 वा. च्या सुमारास  घडला. या घटनेनंतर शहर पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांनी त्या शिक्षिकेस सदर बझार पोलीस ठाण्याकडं नेलंय.

माळशिरस तालुक्यातील एक शिक्षिका तिच्या  वेतन श्रेणी प्रलंबित प्रश्नासाठी येथील माध्यमिक शिक्षण विभागाकडं वाऱ्या करीत होती, दरम्यान या विभागाकडील सूचनांनुसार तिने पुण्याच्या विभागीय कार्यालयाकडून तिच्या वेतन प्रश्नाचा पाठपुरावा केला होता, असंही सांगण्यात आलंय.

ते प्रकरण पुन्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडं आल्यावर शिक्षण अधिकाऱ्यांकडं ते 'जैसे थे' होते. ती शिक्षिका शिक्षण कार्यालयाच्या झिजवत असताना, तिच्या फाईलवर ' निगेटिव्ह रिमार्क' मारल्याचा आरोपही त्या शिक्षिकेने केलाय. 

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचे वर्षभर हेलपाटे मारत असताना तिच्याकडं अनेक वेळा शिक्षण अधिकारी जगताप यांनी शय्या सोबतीची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप खुल्या आवारात केला. 

दरम्यान जिल्हा परिषद आवारात आलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या शिक्षिकेस पोलीस गाडीत बसवून सदर बझार पोलीस ठाण्याकडं नेलंय. या खळबळजनक आरोपामुळं जिल्हा परिषद प्रांगणात थोडा वेळ गोंधळाचं वातावरण असल्याचं दिसून आलं.


To Top