उद्योजकाचे मोठे पाऊल; “ब्लू कुराकओ” शीतपेयाचे दमदार लाँच

shivrajya patra

भाग्यश्री ऍग्रोकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन बाजारात; ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्सची मेजवानी

सोलापूर : स्थानिक उद्योगविश्वात एक नवे पर्व सुरू करत भाग्यश्री ऍग्रोने “ब्लू कुराकओ” या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवीन शीतपेयाचे भव्य लाँच केले आहे. उत्कृष्ट गुणवत्ता, आकर्षक चव आणि सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी किंमत यांचा संगम असलेले हे शीतपेय आता सोलापूरकरांसाठी उपलब्ध झाले असून, आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्याची तयारी भाग्यश्री ऍग्रोने दर्शविली असल्याचं भाग्यश्री ऍग्रोचे प्रमुख यशवंत देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाग्यश्री ऍग्रोचे , “ब्लू कुराकओ” हे केवळ एक शीतपेय नसून गुणवत्ता, विश्वास आणि ग्राहक समाधानाचे प्रतीक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय मानांकन लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले हे उत्पादन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास भाग्यश्री ऍग्रोचे प्रमुख यशवंत देशमुख यांनी व्यक्त केला.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भाग्यश्री ऍग्रोने विविध आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. “ब्लू कुराकओ” सोबत कुपनद्वारे मोफत अंदमान टूर, लक्षद्वीप टूर, कॉर्डेलिया क्रूझ टूर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, तसेच रेल्वे तिकीट परतावा, अशा अनेक योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असं सांगून सोलापूरहून गोवा, मुंबई, हैदराबाद तसेच इतर ठिकाणी विमान किंवा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या विशेष ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहनही भाग्यश्री ऍग्रोचे प्रमुख देशमुख यांनी यावेळी केलं.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक व्यापारी, हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानदार यांच्या सहकार्याने “ब्लू कुराकओ” प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच हे उत्पादन सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार असल्याची माहितीही देण्यात आली.

भाग्यश्री ऍग्रोचे प्रमुख यशवंत लक्ष्मण देशमुख यांनी गांधी नाथ रंगजी विद्यालय, दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व ज्युनियर कॉलेज येथे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दयानंद कॉलेज तसेच चिंचोळी एमआयडीसी येथील वामसी लॅबमध्ये काम करत असताना त्यांनी उद्योजक होण्याचे स्वप्न जोपासले. सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि नव्या संकल्पनांच्या जोरावर त्यांनी आज हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे.

“माझ्यासारख्या नवख्या उद्योजकाला माध्यमांकडून प्रसिद्धी मिळण्याची मोठी अपेक्षा आहे. आपल्या सोलापूरच्या ब्रँडला जगासमोर आणण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल, अशी खात्री आहे,” अशी भावना यशवंत देशमुख यांनी व्यक्त केली.

To Top