सोलापूर : रविवारी, 17 मे 2026 रोजी जिल् हिज्जा महिन्याचा चंद्र दिसून आला नाही. त्यामुळे इस्लामिक दिनदर्शिकेनुसार सोमवारी सायंकाळी 18 मे पासून जिल् हिज्जा महिन्याची सुरुवात होणार आहे.
कमिटीच्या घोषणेनुसार, 29 जिल्काद 1447 हिजरी रोजी चंद्र दर्शन न झाल्याने उर्दू तारीख 30 जिल्काद पूर्ण करण्यात येणार असून, त्यानुसार ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद गुरुवारी, 28 मे 2026 रोजी साजरी करण्यात येणार आहे.
तसेच अरफा (यौमे अरफा) बुधवार दि. 27 मे रोजी असणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. ही घोषणा रुईयत-ए-हिलाल कमिटीचे सदर मुफ्ती काझी सय्यद अमजदअली यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली असून, मुस्लिम बांधवांमध्ये बकरी ईदच्या तयारीला आता वेग आला आहे.
या ईद दिवशी बकरी ची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे बकरे खरेदी करण्यासाठी पशु विक्रीच्या बाजारात मोठी गर्दी असल्याचे दिसत आहे.
शिवभार : सगरी इम्रान, सोलापूर.
