श्री दत्ता म्हात्रे सर व साईनाथ क्रिडा मंडळ मंत्रीवाडी यांच्या मार्फत "विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा २०२६" चं आयोजन

shivrajya patra

पेण /पी. डी. पाटील : साधनांचा अभाव असताना अविश्रांत मेहनत करत आपल्या आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पंचक्रोशीतील इयत्ता 10 वी ते 12 वी. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसहित पालकांचा सन्मान करण्यासाठी दत्ता म्हात्रे  व साईनाथ क्रिडा मंडळ मंत्रीवाडी यांनी " विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा 2026" चं आयोजन करण्यात आलं आहे. हा गुणगौरव सोहळा रविवारी, 24 मे  रोजी मंत्रीवाडी (पेण- रायगड) या ठिकाणी सायंकाळी 06 वा. आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आयुष्यात उत्तुंग झेप घेण्यासाठी निघालेल्या पाखरांच्या पंखांना बळ देण्यासाठी त्यांना भावी आयुष्याच्या वाटा दाखवून स्वतःची वाट निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये जिद्द, प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने दत्ता म्हात्रे  सर व साईनाथ क्रिडा मंडळ मंत्रीवाडी यांच्यामार्फत या विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळ्याचं  आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात प्रमोद जाधव (सांगली) MPSC परिक्षा उत्तीर्ण (कर सहाय्यक व महसुल पदी नियुक्ती) आणि  मोहिनी  थोरात All India Ranking 76 GATE CSE 2025 (IIT MUMBAI) यांचं मुख्य  मार्गदर्शन लाभणार आहे.  

या सोहळ्याला अतुल नंदकुमार म्हात्रे (मास्टर ऑफ आर्किटेक्ट, लंडन), प्रभाकर म्हात्रे (रायगड जि. प. सदस्य), मिलिंद पाटील (सामाजिक कार्यकर्ते), समीर म्हात्रे (उपाध्यक्ष-सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्तान), सौ. मनिषा मंगलदास ठाकूर (सरपंच-ग्रु. ग्रा. पं. दिव), सचिन पाटील(उपसरपंच-दिव), विवेक म्हात्रे (गटनेते- पंचायत समिती, पेण) संताजी पाटील (सामाजिक कार्यकर्ते), डॉ. सुभाष म्हात्रे (डॉक्टरेट मंत्रीवाडी) मंगलदास ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते), प्रफुल्ल म्हात्रे (माजी सभापती सदस्य ग्रुप ग्रा. दिव) 

सुजित म्हात्रे (माजी सदस्य ग्रु. ग्रा. वढाव), सौ. करिष्मा सं. म्हात्रे (सदस्या-ग्रु. ग्रा. पं. दिव) सौ. सुप्रिया पाटील (सरपंच-सु. ग्रा. पं. बोरझे ), रत्नाकर ठाकूर (रायगड भूषण), अविनाश पाटील (निवृत्त मुख्याध्यापक- काळेश्री), कृष्णा लांगी (ग्रामसेवक), शरद म्हात्रे (प्रो. सेरिमा हॉटेल), डॉ. आशिर्वाद मोकल (बेनवले), प्रकाश माळी (पत्रकार), संभाजी पाटील (उपसरपंच-गु. ग्रा. पं. बोरझे ),सौ. प्रणया सिद्धांत पाटील (उरण), रामकृष्ण ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते), जितेंद्र ठाकूर (अध्यक्ष- छावा संघटना) प्रकाश ठाकूर (सामाजिक कार्यकर्ते), सौ. अर्चना मोहन म्हात्रे (माजी सदस्या ग्रु. ग्रा. पं. बोरझे ), वैभव म्हात्रे (वढाव) संतोष म्हात्रे (सामाजिक कार्यकर्ते), जितेंद्र पाटील (खारपाले) पंकज पाटील (पत्रकार), अविनाश गुरुजी (रा. जि. प. शाळा, नारवेल), संजय ठाकूर, एस. के. ठाकूर (शिक्षक- ठाकूर बेडी), मनोज ठाकूर (शिक्षक- ठाकूर बेडी), दयानंद ठाकूर (शिक्षक- ठाकूर बेडी), विजय ठाकूर (शिक्षक- ठाकूर बेडी), प्रल्हाद ठाकूर (शिक्षक- ठाकूर बेडी), संतोष पाटील (शिक्षक- घोडा बंदर) आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमासाठी सुधाकर म्हात्रे (अध्यक्ष- ट्रॉफी फायटर फाऊंडेशन), गंगाराम म्हात्रे, रुपेश पाटील, सत्यविजय ठाकूर, सुहास म्हात्रे (कान्होबा) यांचे विशेष सहकार्य लाभेल तर ग्रामस्थ मंडळ मंत्रीवाडी व महिला मंडळ मंत्रीवाडी यांचे विशेष पाठबळ असणार आहे. 

एक सामाजिक उद्दिष्ट समोर ठेऊन  दत्ता म्हात्रे सर व साईनाथ क्रिडा मंडळ मंत्रीवाडी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा उत्साह वाढवावा आणि सन्मानासोबत करिअर दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या सुवर्ण संधीचा पंचक्रोशीतील   विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

To Top