सोलापूर / 31 : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त पत्रकार कृती समिती व अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने चार हुतात्मा पार्क चौक येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, नितीन करजोळे, मिलिंद प्रक्षाळे, अशोक ढोणे, सिध्दाराम नंदर्गी, अकबर शेख, विश्वनाथ बिराजदार, विजयकुमार झुंजा, नरेंद्र संब्बन, उपेंद्र गायकवाड, सुधीर ढोले आदी उपस्थित होते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय व आदर्श कारभाराचा गौरव करत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार बांधव, माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थितीही होती.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श समाजापुढे कायम ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला.
