गुन्हे करणारी टोळी जिल्ह्यातून तडीपार

shivrajya patra

सोलापूर : गेल्या पाच वर्षात टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखापत करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, चोरी करणे आणि घरफोडीसारखे गुन्हे दाखल असलेल्या टोळीतील तिघांना सोलापूर पोलीस आयुक्तालयानं सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून 02 वर्षांकरिता तडीपार केलंय.

टोळी प्रमूख तेजस सुधाकर बैरुनगी (वय-24 वर्षे), रोहीत यल्लप्पा लोणी (वय-24 वर्षे) आणि संदेश नागेश रामगुडे (वय-23 वर्षे, सर्व रा. साठे पाटील वस्ती, जुना देगाव नाका, सोलापूर) अशी तडीपार आरोपींची नांवे आहेत. त्यांच्याविरुध्द 2021, 2022, 2023 आणि 2025 या काळात अनेक गुन्हे दाखल आहेत, असं पोलिसांचं म्हणणे आहे.

या टोळीविरूध्द सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर यांनी 25 मे रोजी टोळीप्रमुख तेजस बैरुनगी, रोहीत लोणी आणि संदेश रामगुडे या तिघांना सोलापूर शहर आणि उर्वरीत सोलापूर जिल्ह्यातून 02 वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.

To Top