स्वर्गीय आशाताईंना स्वरांजली ' अभी ना जाओ छोड़कर ' शनिवारी सदाबहार स्वरांजली

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्राचे महागायक विजेता तथा उर्दू घर सांस्कृतिक समिती सोलापूर चे संचालक मोहम्मद आयाज आणि सारेगमप, मुंबई च्या आस्था लोहारे यांच्या गायनाचा कार्यक्रम शनिवारी, 30 मे रोजी सायंकाळी 07.00 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे सादर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या सदाबहार अविट गाणी सोलापुरातील सुजाण रसिकांच्या सेवेसाठी अनोखी मेजवानी ठरणार आहे. 

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य असून काही आसनं निमंत्रित मान्यवरांसाठी आरक्षित आहेत. तरी रसिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

या कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदिका मंजुषा गाडगीळ, व संगीत संयोजन अविनाश इनामदार, साहीर नदाफ यांच्यासह गायिका भाग्यश्री चव्हाण, करण भोसले, सिद्धार्थ ,विनोद, रामसह इतर प्रसिद्ध कलावंतांचा समावेश आहे.

या कार्यक्रमास सोलापुरातील वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक रसिकांची उपस्थिती लाभणार आहे, असे आवाहन उर्दू घर, सोलापूर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे.

To Top