कुमठे : येथील कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ध्वजारोहण संस्थेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने, नागनाथ माने, प्रा. स्वाती माने उपस्थीत होते . 

प्रारंभी नगरसेवक विश्वस्त जयकुमारे माने यांनी आजचा स्पर्धेच्या युगात आपली प्रगती साधायची असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही, आपण आपली प्रगती करायची पर्यायाने महाराष्ट्र राज्याची प्रगती आपण करता येते. आज कामगार दिन असून शेतकरी-कष्टकरी कामगारांच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी संस्था वारंवार प्रयत्न करत आहे, असे विचार मांडले. 
याप्रसंगी मंचावरती प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड, पर्यवेक्षक वसंत गुंगे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मंजूश्री जमखंडीकर, एस.पी.एम. च्या प्राचार्या रोहीणी चव्हाण, लिटल स्टारच्या प्रिन्सिपल शुभांगी पवार, मलकारी कोरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उर्मिला बनसोडे यांनी केले तर वसंत गुंगे यांनी आभार मानले.
