आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस माणसांपासून दूर जात असताना समाजात प्रेम, जिव्हाळा, बंधुभाव आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ व्हावे, प्रत्येक सामान्य व्यक्तीचा वाढदिवस सन्मानाने आणि आनंदाने साजरा व्हावा, या उदात्त भावनेतून हा आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. “वाढदिवस हा फक्त केक कापण्याचा क्षण नसून आपल्या माणसांच्या प्रेमात आणि सन्मानात जगण्याचा आनंदोत्सव आहे,” अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
चाणक्य गुरुकुल व बसव संगम शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने काशिनाथ भतगुणकी समन्वयक सोहळ्यात 01 जून रोजी वाढदिवस असणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी सामूहिक केक सेलिब्रेशन, सन्मान सोहळा, स्नेहभोजन तसेच आनंदी वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सोलापूरच्या कन्या नूतन खासदार ज्योती वाघमारे, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे , नगरसेवक प्रियदर्शन साठे ,जिल्हा प्रमुख अमर पाटील, जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, शहर प्रमुख सचिन चव्हाण, माजी नगरसेविका शैलजा राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असून,यामध्ये पत्रकार, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी वाढदिवस धारकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा, शाल आणि पवित्र रोप भेट देऊन गौरव करण्यात येणार आहे.
हा भव्य सोहळा सकाळी 10 ते दुपारी 02 या वेळेत श्री सिद्धेश्वर रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट, गजानन महाराज मंदिराजवळ, सोरेगाव ते कुमठे रोड, विजापूर रोड, सोलापूर येथे संपन्न होणार असून, सन्मान सोहळ्यासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे.
तरी 01 जून रोजी वाढदिवस असणाऱ्या नागरिकांनी तसेच त्यांच्या मित्र, नातेवाईक, सहकारी आणि परिचितांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे.
नांव नोंदणीसाठी संपर्क :
