महसूलची वारी शेतकऱ्यांच्या दारी : नुकसान गाव भरपाई वाटपासाठी भेट दौरा कार्यक्रम

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्र शासन महसूल विभागांतर्गत "महसूलची वारी, शेतकऱ्यांच्या दारी" या उपक्रमाअंतर्गत नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरीडोर प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप करण्यासाठी गाव भेट दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी दिली. 

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. 11) कार्यालय, कृष्णा खोरे, सोलापूर यांच्या वतीने ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई नोटीस मिळूनही अद्याप रक्कम स्वीकारलेली नाही, अशा खातेदारांना थेट गावात जाऊन नुकसान भरपाई वाटप करण्याची योजना आखण्यात आली आहे.

या दौऱ्यांतर्गत दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये महसूल जनसंवाद कार्यक्रम होणार असून, मंडळ अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालये तसेच सांस्कृतिक सभागृह अशा ठिकाणी शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. 

कार्यक्रमाचे वेळापत्रक : 

- दक्षिण सोलापूर : मुस्ती/तिर्थ (9 मार्च), तांदुळवाडी/धोत्री (10 मार्च) 

- बार्शी : वैराग परिसरातील गाव (11 मार्च), अलीपूर परिसरातील गाव (13 मार्च), पानगाव परिसरातील गाव (14 मार्च) 

- अक्कलकोट : चपळगांव परिसरातील गाव (16 मार्च), मैंदर्गी नगरपरिषद (17 मार्च), नागणहळळी व मिरजगी (18 मार्च) 

या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना थेट गावात जाऊन नुकसान भरपाई मिळणार असून, शासनाच्या महसूल जनसंवाद उपक्रमाला गती मिळणार आहे. तरी संबंधित ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रमांक- 11) डॉक्टर सीमा होळकर यांनी केलं आहे.

To Top