भारतरत्न इंदिरानगर येथील महापालिका शाळेत महिला दिन साजरा

shivrajya patra

नगरसेविका राजश्री धोडमनी यांच्यावतीने शाळेला सीसीटीव्ही संच भेट

- होम मिनिस्टर स्पर्धेलाही उदंड प्रतिसाद

सोलापूर : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतरत्न इंदिरानगर येथील मनपा मुलांची मराठी शाळा क्र.5 आणि 12 मध्ये महिला दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वार्डाच्या नगरसेविका सौ. राजश्री धोडमनी यांनी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वखर्चातून शाळेला 04 सीसी टीव्ही कॅमेऱ्याची भेट दिली.

माजी महापौर श्रीकांचना यन्नम व प्रभागाच्या नगरसेविका सौ. राजश्री धोडमनी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिला दिनानिमित्त आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.यावेळी जवळपास 100 हून अधिक महिला-पालकांची उपस्थिती होती. 

होम मिनिस्टर स्पर्धेनंतर कार्यक्रमातील विजेत्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मानाची पैठणी, द्वितीय बक्षीस डिनर सेट, तृतीय बक्षीस हॉटपॉट, उत्तेजनार्थ पारितोषिक, उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संदीप घोळवे, मनिषा क्षीरसागर  अर्चना मनअंकलगी, वैशाली बोते, प्रांजली तरंगे, सुवर्णा माने, मीनाक्षी गुळवे, बालवाडी शिक्षिका दिलपाक, हिबारे मॅडम, राजश्री मॅडम, भालेराव मॅडम, .शिपाई बाळशंकर आदींनी परिश्रम घेतले.

To Top