चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत महिला दिवस साजरा

shivrajya patra
सोलापूर : येथील फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जे. बी. बागबान होते. 
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा वेशभुषा परिधान करून त्यांच्याबद्दल माहिती दिली. तसेच शाळेतील महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आले. 
आयेशा नदाफ यांनी महिला दिनाची माहिती दिली. मुख्याध्यापिका सौदागर गजाला यांनी शाळा व संस्थेची माहिती दिली. सुत्रसंचालन खतिब उम्मे हबीबा यांनी तर चौधरी चास्मीन  यांनी आभार मानले. कार्यकमाला यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
To Top