सोलापूर : येथील भवानी पेठ ढोर गल्ली येथील सुप्रसिध्द समाजसेवक तथा डॉक्टर नंदकुमार रतिलाल सोनकवडे यांचं सोमवारी, 09 मार्च रोजी सकाळी निधन झाले. ते मृत्यू समयी 58 वर्षीय होते.
त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी, 10 मार्च रोजी सकाळी 10 वाजता भवानी पेठ ढोर गल्ली येथील राहत्या घरापासून निघून रूपाभवानी स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार होणार आहेत, असं सांगण्यात आलंय. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
ते वीरशैव कक्कय्या मध्यवर्ती जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. वैद्यकीय व्यवसायासोबत राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये ते कंत्राटदार म्हणूनही कार्यरत होते.
