मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कासेगांव इथं पार पडला महिला सक्षमीकरण कार्यक्रम

shivrajya patra

सोलापूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत कासेगांव येथे महिला सक्षमीकरण सप्ताहानिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, दक्षिण सोलापूर यांच्या वतीने गुरुवारी, 05 मार्च रोजी महिला सक्षमीकरण कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये गर्भवती महिलांचे सामुहिक डोहाळे जेवण, अन्न प्राशन कार्यक्रम, सदृढ बालक स्पर्धा आणि मुलीच्या नावे वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच यशपाल वाडकर यांनी महिला सक्षमीकरण व गावाच्या विकासासाठी महिलांचे योगदानाचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमास उपस्थित गरोदर माता, स्तनदा मातांना, महिला व ग्रामस्थ यांना  बालकांचे पहिले 1000 दिवस अन्न प्राशनबाबत पर्यवेक्षिका श्रीमती नम्रता चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तसेच परिचारिका श्रीमती रवळे यांनी आहार व आरोग्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात सुदृढ बालकांना भेटवस्तू देण्यात आल्या. मुलींच्या नावे वृक्षारोपण करण्यात आले. सर्वाच्या समक्ष बाळाला मातांच्या हातून अन्न प्राशन करण्यात आले. त्याचबरोबर महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमास  उपसरपंच शहाजहान शेख, ग्रामपंचायत सदस्या सौ. अनिता हेडे, सौ. सोनाली वाडकर आदींसह गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

To Top