याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आईचे नावे खरेदी केलेल्या शेतजमीनीच्या खरेदी दस्तावर प्राप्त हरकतीचे निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावून तक्रारदार यांच्या आईचे नावे केलेल्या खरेदीची नोंद ग्राह्य धरून त्यांचं नाव सात-बारा उताऱ्यावर लावण्यासाठी संगेवाडी मंडलाच्या मंडल अधिकारी श्रीमती विजया महारूद्र नाईक यांनी तक्रारदार याचे सोबत पंचासमक्ष पडताळणी दरम्यान कामासंबंधी बोलून बाकी बोलणी त्यांचे खाजगी वाहन चालक वैभव पिराजी मोरे याच्याशी करण्यास सांगितले.
त्यावेळी वैभव मोरे याने तक्रारदार यांना त्या कामाचे मंडल अधिकारी श्रीमती विजया नाईक यांच्या करीता तडजोडीअंती 7, 000 रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम लवकर घेऊन येण्यास सांगितले.
वैभव मोरे यांनी मंडल अधिकारी श्रीमती नाईक यांच्यावतीने केलेल्या लाच मागणीबाबत श्रीमती नाईक यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता, त्यांनी त्यांचे खाजगी वाहनाचे चालक वैभव मोरे यांनी केलेल्या लाच मागणीस दुजोरा देऊन अपराधास प्रोत्साहन दिले. याप्रकरणी लाच लचपत प्रतिबंधक विभा ग सोलापूर कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीची पडताळणी करून सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते (ए.सी.बी., सोलापूर) यांच्या यांच्या पथकानं गुरुवारी सापळा रचला. 
त्यानंतर करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान मंडल अधिकारी श्रीमती नाईक यांच्या खाजगी वाहनाचे चालक वैभव मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडून 7,000 रुपयांची मागणी करून 7,000 रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारले असता, त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईनं तहसील कार्यालय परिसरात खळबळ उडालीय. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात श्रीमती विजया महारूद्र नाईक (वय- ४५ वर्षे, पद मंडळ अधिकारी, नेमणुक संगेवाडी मंडळ, तहसिल कार्यालय सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर, रा. प्लाट नं.१३, सहयाद्री नगर, इसबावी, पंढरपूर) आणि वैभव पिराजी मोरे (वय- २८ वर्षे, रा. मुंढेवाडी, ता. पंढरपूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. पोलीस निरीक्षक शैलेश पवार (ए.सी.बी., सोलापूर) या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे (ए.सी.बी. पुणे, मो.क्र ९८२३१६७१५४), अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील (ए.सी.बी. पुणे. मो.क्र ९०२९०३०५३०), यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (ए.सी.बी. सोलापूर), पोलीस निरीक्षक रविंद्र लांभाते (ए.सी.बी. सोलापूर) पोलीस अंमलदार संतोष नरोटे, गजानन किणगी, प्रियंका गायकवाड, अक्षय श्रीराम (सर्व नेमणुक - ए.सी.बी. सोलापूर) यांनी केली.
... नागरिकांना आवाहन
लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले (ए.सी.बी. सोलापूर.मो.क्र. ९८२३२२५४६५) यांनी केलं आहे.
संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक, सोलापूर.
संकेतस्थळ- www.acbmaharashtra.gov.in
ई-मेल-www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप- acbmaharashtra.net
टोल फ्री क्रमांक १०६४
दुरध्वनी क्रमांक- ०२१७-२३१२६६८
व्हॉटसअॅप क्रमांक-९४०४ ०० १०६४
