खात्यावर रक्कम नसताना धनादेश दिल्याप्रकरणी मिनाक्षी सोलनकर हिला शिक्षा

shivrajya patra

सोलापूर : खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक नसताना श्रीशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या संस्थेस खोटे चेक दिल्याप्रकरणी मिनाक्षी हरीश सोलनकर यांना न्यायदंडाधिकारी सौ. ऐश्वर्या जाधव यांचेसमोर होऊन आरोपीने गुन्हा केल्याचे शाबीत झाल्यामुळे आरोपीस 01 महिना शिक्षा आणि  30,000 रुपये नुकसान भरपाई आरोपीने वादी पतसंस्थेस द्यावी, असा निकाल दिला, तसेच सदर नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास आणखीन 01 महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, सोलापुरातील श्रीशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संस्थेकडून मिनाक्षी हरीश सोलनकर (रा. सोलापूर) हिला घरगुती कारणासाठी कर्ज दिले होते. 

त्या कर्जापोटी कारण म्हणून दिलेले धनादेश श्रीशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था यांनी खात्यावर भरले, परंतु ते धनादेश "खात्यात रक्कम शिल्लक नाही" म्हणून न वटता परत आले. त्यानंतर श्रीशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर यानी अॅडव्होकेट सौ. सुनीता जी. नाईक (नरोटे) यांचेमार्फत आरोपी मिनाक्षी हरीश सोलनकर यांना नोटीस दिली.

ती रक्कम नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आंत देऊन पावती घेण्यास कळविले होते. परंतू आरोपीने मुदतीत रक्कम दिली नाही, या कारणास्तव श्रीशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यांनी फौजदारी न्यायालयात दि निगोशिएबल इन्स्ट्रुमेट अॅक्ट १३८ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. 

या प्रकरणाची सुनावणी न्यायदंडाधिकारी सौ. ऐश्वर्या जाधव यांचेसमोर होऊन चौकशी अंती आरोपी मिनाक्षी हरीश सोलनकर हिस गुन्हा केल्याचे शाबीत झाल्यामुळे आरोपीस 01 महिना शिक्षा आणि  30,000 रुपये नुकसान भरपाई आरोपीने वादी पतसंस्थेस द्यावी, असा निकाल दिला, 

या प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅड. सुनीता जी. नाईक (नरोटे) यांनी काम पाहिले.


To Top