राह-प्लॉट नं. 336, ग्राऊंड फ्लोअर गल्ली नं.02, हायटेंशन रोड, कपासहेडा दक्षिण-पश्चिम नवी दिल्ली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,
28 जुलै 2025 रोजी सांयकाळी 04.00 वा. चे सुमा घरी असताना फसवणुकदाराने अनोळखी मोबाईलवरुन तक्रारदार यांना संपर्क साधुन मी टेलीकॉम डिपार्टमेंटमधून टेलिकॉम ऑफिसर बोलत आहे, असे सांगुन तुमचा मोबाईल क्रमांकाचा मिस युज झालेला आहे.
तुमच्या विरोधात मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास कुलाबा पोलीस स्टेशन मुंबई येथील पोलीस सब इन्स्पेक्टर विजय खन्ना हे करीत आहेत असं सांगितले.
पुन्हा तक्रारदार यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून (+917207888598) वॉटस्अप कॉल करुन मी विजय खन्ना सब इन्स्पेक्टर कुलाबा पोलीस स्टेशन मुंबई येथून बोलत आहे, असे सांगुन तक्रारदार यांची कौटुंबिक माहिती घेऊन कुलाबा पोलीस स्टेशन येथे एक मनी लाँडरींगचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास सीबीआय ऑफिसर प्रविण सुद हे करीत आहेत, असे सांगितले व फोन ठेवला.
पुन्हा दुसऱ्या अनोळखी वॉटसअॅप क्र. +919146979289 यावरून कॉल करुन, तक्रारदार यांचे नावे असलेले एक डुप्लीकेट आधार कार्डची फोटो कॉपी व तक्रारदार यांच्या नावे असलेले कॅनरा बँकेचे एटीएम कार्डची फोटी कॉपी पाठवून, तुमचे हे आधारकार्ड व एटीएमकार्ड कुलाबा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या मनी लाँडरींग गुन्ह्यातील आरोपी नरेश गोयल याचे घरामध्ये सापडले आहे.
या गुन्ह्यात नरेश गोयल यास अटक केली असून तपासामध्ये आपल्या नावे असलेल्या कॅनरा बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक उलाढाल झाली, असून या प्रकरणामध्ये आपलाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, असे सांगितले. तक्रारदार यांचे नावाने अरेस्ट वाँरट, सुप्रिम कोर्टाची नोटीस सव्हॅलन्सचे ३ पानी इंग्रजी मध्ये नियम असलेली नोटीस व्हॉटसअॅपवर पाठवून भिती घालून तक्रारदारास एकूण 21,25,161 रुपये इतकी रक्कम वेगवेगळ्या खात्यात विभागणी करुन पाठविण्यास सांगून त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याबाबत भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), ३१९ (२),२०४,३५१ (२), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे 04 डिसेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर एक्स्पर्ट टिमने तांत्रिक विश्लेषण व इतर पुरावे याद्वारे दिल्ली येथून आरोपी राघवेंद्र सिंग मुलचंद (राह-प्लॉट नं. 336, ग्राऊंड फ्लोअर गल्ली नं.02, हायटेंशन रोड, कपासहेडा दक्षिण-पश्चिम नवी दिल्ली.) यास 17 मार्च रोजी अटक केली.
आरोपीताकडून पोलीस कोठडी दरम्यान त्याचा 01 साथीदार निष्पन्न झाला असून, उर्वरीत साथीदारांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात अटकेतील आरोपी याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि फसवणूक रकमेपैकी 9,50,000 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आलीय. हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. उर्वरीत आरोपीतबाबत तपास सुरु आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) श्रीमती. डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीशैल गजा यांच्यासोबत पोलीस उप-निरिक्षक नागेश इंगळे, पोसई/प्रविण भोपळे, पोहेकॉ/१३८१ गंगावणे, पोहेकॉ/१३४८ कृष्णात जाधव, पोहेकॉ/६०१ प्रकाश गायकवाड, पोहेकॉ/२०१ मच्छिंद्र राठोड, पोकॉ/६६५ रतिकांत राजमाने यांनी पार पाडली.