पारंपारिक शिवकालीन मैदानी खेळांचा वारसा जपणाऱ्या 35 खेळाडूंचा विडी घरकुल इथं होतोय सन्मान सोहळा

shivrajya patra

सोलापूर :  पारंपारिक शिवकालीन मैदानी खेळांचा वारसा जपणाऱ्या 35 खेळाडूंचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम बुधवार, दि. 11 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5.30  वाजता जुना विडी घरकुल येथील कै. प्रकाश तुकाराम सोमा सभागृह, जुना विडी घरकुल, एच ग्रुप, हैदराबाद रोड, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

योंगमुडो, दांडपट्टा, लाठी-काठी या खेळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षक, मागर्दर्शक यांच्यासह 35 हून अधिक महिला खेळाडूंचा आदर्श-सर्वोत्कृष्ट खेळाडू, आदर्श प्रशिक्षक, मार्गदर्शक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रुद्रशक्ती गुरुकुल शिवकालीन मर्दानी व क्रीडा प्रशिक्षण केंद्र, विडी घरकुल येथील महिला खेळाडूंच्या वर्षभरातील अप्रतिम कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे.

हा कार्यक्रम कन्या फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. तसेच धनश्री विविध विकास संस्था, रुद्रशक्ती गुरुकुल शिवकालीन मर्दानी व क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि योंगमुडो असोसिएशन यांच्या विद्यमाने आयोजित केला आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कन्या फाऊंडेशनच्या प्रमुख योगिता मठपती, धनश्री विविध विकास संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ स्वामी, योंगमुडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सरचिटणीस नागेश शेट्टीकर, रुद्रशक्ती गुरुकुल शिवकालीन मर्दानी व क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षां संगिता फुलारी, उपाध्यक्षा रोहिणी भुसारे, सचिवा संजना मिस्कीन, समाजसेवक हरीश सोमा,मीनाक्षी सोमा, मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्कीन, साक्षी कानगुडे, पूजा शेट्टीकर, बसवराज मठपती, रोटरी क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष जी.एच.पाटील, खेळाडू, पालकवर्ग उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी नागेश शेट्टीकर (98346 59455, 96236 12805), बसवराज मठपती (9422653131, 9422053131), नीलकंठ स्वामी (94043 03939, 9371529795), विवेक मिस्कीन (95030 39627) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

============

या मान्यवरांचा होणार सन्मान :
01) मीनाक्षी हरीष सोमा,
02) हरीष प्रकाश सोमा,
03) विवेक विजय मिस्कीन,
04) संगिता योगिनाथ फुलारी,
05) रोहिणी तुकाराम भुसारे,
06) संजना विवेक मिस्कीन,
07) नागेश शशिकांत शेट्टीकर,
08) जी.एच.पाटील,
09) सोनाक्षी मोहन माडे,
10) पूजा नागेश शेट्टीकर
11) भावना अजय गड्डम,
12) स्वप्नाली नृसिंह जमादार,
13) दर्शनी संतोष सोमा,
14) श्रद्धा दीपक इप्पनपल्ली,
15) गौरी गिरीराज माळी,
16) वेदश्री अमरनाथ गुडूर,
17) प्रवलिका मोहन कामुर्ती,
18) जानवी मल्लिकार्जुन म्हेत्रे,
19) बिंदूप्रिया भास्कर कुने,
20) वैभवी शिवानंद आळगुडगी,
21) तेजल अंबादास रच्चा,
22) मान्यता देविदास रोहिटे,
23) संध्या सोमण्णा पुजारी,
24) श्रद्धा तानाजी सरवदे,
25) ममता नागनाथ अलशेट्टी,
26) आदिती नंदकुमार नल्ला,
27) पल्लवी सिद्राम बिनगुंडी,
28) भविष्या सतीश सिंदम,
29) आराध्या बसवराज मसरेड्डी,
30) नव्या राजेश कुस्मा,
31) कोमल कृष्णा मनीकोंडा,
32) श्रावणी सुनील गवळी,
33) साक्षी शशिकांत कानगुंडे,
34) मोनिका नागेश कसबे,
35) ममता चंद्रशेखर मंडल.
===========

To Top