जागतिक महिला दिनी नाभिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सोलापुरातील तमाम महिलांच्या प्रतिनिधी म्हणून उपमहापौरांचा सत्कार

shivrajya patra

सोलापूर : सोलापूरच्या उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर यांना सोलापुरातील तमाम महिलांच्या प्रतिनिधी या नात्याने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीवास्तव नाभिक समाज युवा महिला सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

 "नाभिक समाजातील महिलांना अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे. समाजाच्या भल्यासाठी तुम्ही संघटित होऊन लढताना पाहून मनापासून कौतुक वाटते, असं उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी म्हटले.

माझ्या कक्षेतील समस्या सोडवण्यासाठी मला हाक द्या. महानगरपालिकेत माझ्याकडे जरूर या, मी तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन आणि सोबत राहीन." या शब्दात उपमहापौर देवकर यांनी सत्काराला उत्तर देताना नाभिक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी महिला संघटक सौ. वनिता मालतुमकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश, महिला दिनाचे महत्व आणि प्रतिष्ठानच्या वाटचालीची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साधना हिरापूरकर होत्या. 

या निमित्ताने देवकर यांच्या हस्ते वत्सला गोगी, कविता मालतुमकर, दिपाली श्रीमंगले, विनिता मॅकलवार, रूपा वड्डेपल्ली, पार्वती वनस्कर, प्रेरणा कट्टिमणी, शैला मालतुमकर, जयश्री मॅकलवार, सारीका मॅकलवार, मधुमती मॅकलवार आदींचा विशेष योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. नागवेणी भरतनूर यांनी आभार मानले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय श्रीमंगले, युवराज मालतूमकर, राजकुमार मालतुमकर, किरण सर्दनकर यांनी विशेष सहकार्य केले.

To Top